औरंगाबाद महाराष्ट्र

“या तारखेला मुख्यमंत्री फडणवीस विधानसभा बरखास्त करतील”

औरंगाबाद | 28 फेब्रुवारी रोजी विधानसभेचे अधिवेशन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा बरखास्त करतील. भाजपला लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घ्यायच्या आहेत, असं वक्तव्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

राजीव गांधी स्टेडीयमवर गुरुवारी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेतल्या जातील, त्यामुळे कामाला लागा. मतांचे विभाजन टाळा आणि भाजप-शिवसेनेला पाडा, असं आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केलं.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीला माझी हात जोडून विनंती आहे. भाजपला मदत होईल असं काही करु नका, असं त्यांनी प्रकाश आंबेडकरांना उद्देशून म्हटलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

‘हे’ तीन नवे किंगमेकर ठरवणार देशाचा नवा पंतप्रधान!

बास झालं आता, धोनीबद्दल काही बोलाल तर खबरदार- रवी शास्त्री

-श्रेय तुम्हीच घ्या, पण एकदाचा प्रभू श्रीरामाचा वनवास संपवा- उद्धव ठाकरे

-चंद्रकांत पाटलांच्या विरोधात ‘हे’ माजी आमदार निवडणुकीच्या रिंगणात!

PMO च्या ‘त्या’ ट्विटमुळं जितेंद्र आव्हाडांचा पहिल्यांदा बसला PMOच्या म्हणण्यावर विश्वास

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या