बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील बँकेवर फिल्मी स्टाईल दरोडा, घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद; पाहा व्हिडीओ

पुणे | राज्यात आणि देशात बँक लुटल्याच्या अनेक घटना घडताना दिसतात. भरदिवसा बँका लुटल्या जात आहेत. त्यातच आता पुण्यात महाराष्ट्र बँकेत दिवसाढवळ्या दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून लाखो रूपयांची रक्कम आणि सोनं लुटल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात महाराष्ट्र बँकेत दरोडा पडला आहे. सदर घटना शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे घडली असून दुपारी दीडच्या सुमारास दरोडा टाकल्याची माहिती आहे. पोलिसांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदूकीच दाख दाखवून 31 लाख रूपये रोख रक्कम लुटली आहे. तसेच दोन कोटी रूपयांचं सोनं देखील लंपास केल्याचा प्राथमिक माहिती मिळाली आहे.

घटनेचा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरोडेखोरांनी काळ्या रंगाचे कपडे घातलेले दिसतात. पाच दरोडेखोर अचानक बँकेत शिरले. बँकेत शिरल्यानंतर दरोडेखोरांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदूकीचा धाक दाखवून रक्कम पिशवीत भरायला सांगितली. चोरांनी पुर्णत: तोंड झाकलेलं दिसत आहे. या पाच चोरट्यांनी लॉकरमधील सर्व सोनं लुटून गाडीत पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे सदर परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. वेळ न दवडता पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बँकेतील घटनेची पाहणी करत पोलिसांनी पंचनामा केला आहे. मात्र, हा परिसर ग्रामीण आहे आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेणं हे पोलिसांसाठी मोठं आव्हान असणार आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या- 

जखमी असतानाही कोलकाताचा ‘हा’ खेळाडू खेळला प्लेऑफचे सामने

‘आरोप सिद्ध झालेत आता त्यांनी राजीनामा द्यावा’; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

अन् शाहरूख खानला झाला ‘त्या’ नियमांचा फायदा! आर्यनला धीर देत शाहरूख म्हणाला…

‘…तर आम्ही खपवून घेणार नाही’; वानखेडे-मलिक वादात आता मनसेची उडी

पठ्ठ्यानं एकाच षटकात खेचले 8 षटकार; ‘या’ खेळाडूची क्रिकेटविश्वात चर्चा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More