बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी, वाचा एका क्लिकवर

मुंबई | गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रभर हाहाकार माजवल्याचं चित्र पाहायला मिळालं. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेवरही मोठ्या प्रमाणात ताण आला आणि परिणामी अनेकांना उपचाराअभावी आपला प्राण गमवावा लागला. परंतु, आता महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ही हळूहळू आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र आहे.

आज महाराष्ट्रात 09 हजार 844 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच 09 हजार 371 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. 24 तासात महाराष्ट्रात 197 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 60 लाख 07 हजार 431 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 57 लाख 62 हजार 661 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रात 1 लाख 19 हजार 859 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, गेल्या काही महिन्यात वाढणारी रुग्णसंख्या ही कमी झाल्याने महाराष्ट्रात दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनलॉकला देखील सुरुवात झाली आहे. अशीच रुग्णसंख्या कमी होत राहिली तर महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल.

थोडक्यात बातम्या

महाराष्ट्र अनलॉक मात्र ‘या’ जिल्ह्याची चिंता वाढली; एका दिवसात आढळले तब्बल 695 रुग्ण

घाईघाईने निर्बंध शिथिल करु नका; ‘या’ 7 जिल्ह्यांमुळे मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात आज फक्त 7 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर एकही मृत्यू नाही

“काँग्रेसने ‘ते’ काम केलं म्हणून एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More