बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू, मुलगी मात्र सुखरुप

बीड | अमेरिकेत राहत असलेल्या अंबाजोगाईमधल्या तरुण दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. ही आत्महत्या आहे की खून या संदर्भात कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही.

बालाजी भारत रुद्रवार आणि आरती बालाजी रुद्रवार अशी या मृत पती-पत्नीची नावं आहेत. बालाजी भारत रुद्रवार आणि आरती बालाजी रुद्रवार यांना चार वर्षांची मुलगी देखील आहे. मुलगी सुखरुप असल्याची माहिती आहे.

बालाजी हा अंबाजोगाईतील प्रसिद्ध व्यापारी भारत रुद्रवार यांचा मुलगा होता. स्थानिक पोलिसांनी या घटनेबाबत भारत रुद्रवार यांना फोनवरुन माहिती दिली. आयटी कंपनीतील नोकरीच्या निमित्ताने बालाजी सहा वर्षापूर्वी अमेरिकेत न्यू जर्सीमधील अर्लिंग्टन भागात कुटुंबासह स्थायिक झाला होता. बुधवारी सायंकाळी त्यांची चार वर्षीय मुलगी विहा गॅलरीत बराच वेळ एकटीच रडत थांबल्याचे दिसून आल्याने शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळवलं.

दरम्यान, रुद्रवार दाम्पत्याच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. मात्र या घटनेमुळे रुद्रवार कुटुंबीय प्रचंड मानसिक धक्क्यात आहेत.

थोडक्यात बातम्या- 

‘भविष्य मोलाचं पण जीव अनमोल आहे’; ‘एमपीएससी’ पुढे ढकलण्याची सर्व पक्षीय नेत्यांची मागणी

प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केलं असतं तर लसींचा तुटवडा जाणवला नसता- उदयनराजे भोसले

‘कोरोना लढ्यात राजकारण नकाे, राजकीय पक्षांना समज द्या’; उद्धव ठाकरेंची मोदींना विनंती

‘किमान संकट काळात तरी राजकारण करू नका’; रोहित पवारांनी भाजप नेत्यांना फटकारलं

काळजी घ्या! कोरोनाची ही नवी लक्षणं आली समोर

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More