बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शपथविधी वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांचं नायडूंना पत्र, म्हणाले…

मुंबई | शपथ ग्रहण प्रक्रिये संदर्भात सर्व संबंधितांकरिता निश्चित अशी मार्गदर्शक तत्वे किंवा आचारसंहिता ठरवून देण्याची विनंती महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे केली आहे.

नव्याने निवडून आलेले सदस्य आणि विधीमंडळ सदस्य निर्धारीत केलेली शपथ घेत नसून ते आपल्या आराध्यदैवतांची, पक्षश्रेष्ठींची नाव घेऊन शपथ घेतात. त्यांच्या अशाप्राकरे शपथ घेण्याने शपथविधीचं गांभीर्य कमी होत असल्याचं कोश्यारी यांनी पत्रात नमूद केलं आहे.

दोन दिवसांमागे भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ झाल्यावर शेवट जय भवानी जय शिवाजी, ही घोषणा दिली. त्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना समज दिली. यावरून मोठा वादंग उठला होता. याच पार्श्वभूमीवर भगतसिंह कोश्यारी यांनी ओम बिर्ला आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंकडे ही मागणी केली आहे.

दरम्यान, कोश्यारींच्या या मागणीवर ओम बिर्ला आणि व्यंकय्या नायडू काय निर्णय घेतात आणि कोश्यारींच्या पत्राला कशाप्रकारे उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

कोरोना विषाणूच्या संकटावर मात करायची असेल तर सर्वांनी एकत्र लढले पाहिजे- शरद पवार

पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्याचा निर्णय; वर्षा गायकवाड यांची घोषणा

“नेहरू, गांधी कुटुंबीयांपासून काँग्रेसला वाचवण्याची गरज”

“कोणत्याही संकटात लोकांसाठी झोकून काम करणं, हीच शिवसेनेची खरी ओळख”

तरुणांनी एकत्र येत गावात 430 झाडं लावली; नतद्रष्टांनी त्यातील 30-35 झाडं तोडली!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More