Top News आरोग्य राजकारण

राजभवनात कोरोनाचा शिरकाव…राज्यपालांची पहिली प्रतिक्रिया, म्हणतात…

मुंबई | महाराष्ट्राच्या राजभवनात देखील कोरोनाने शिरकाव केला असून तब्बल 16 जणांना कोरोनाची लागण झालीये. राजभवानातील व्यक्तींनाही कोरोना झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतःला क्वारंटाइन करून घेतल्याचं म्हटलं जात होतं. मात्र राज्यपालांनी आपण स्वतःला क्वारंटाइन केलं नसल्याचं म्हटलंय.

राज्यपालांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. आपली प्रकृती ठणठणीत असून आपण स्व-विलगीकरणात नाही. आपण आवश्यक टेस्ट केल्या असून त्यांचे परिणाम देखील नकारात्मक आले आहेत. कोरोनाची लक्षणे देखील आपल्यात दिसून आली नाहीत. आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मुखपट्टीचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर, आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहोत.

राजभवनातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबई महापालिकेनं या कर्मचाऱ्यांच्या पुन्हा एकदा चाचण्या केल्या आहेत. कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतःला क्वारंटाइन केल्याचं वृत्त समोर आलेलं. मात्र हे निराधार असल्याचं राज्यपाल कोश्यारी यांनी ट्विट करून म्हटलंय.

राज्यपालांचे कार्यालय व निवासस्थान असलेल्या राजभवनातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी 16 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. यानंतर महापालिकेने राजभवनाचं तातडीने सॅनिटायझेशनही केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण, सचिन तेंडुलकरचं लगोलग ट्विट, म्हणतो…

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण, रेखा यांचा बंगला सील!

अमिताभ यांच्या पाठोपाठ अभिषेकचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

शरद पवार मुलाखत स्पेशल बातम्या-

परवा गलवान खोऱ्यामध्ये बंदूक वापरली नाही ‘तो’ आम्ही केलेल्या कराराचा भाग- शरद पवार

आपले शेजारी आपल्याच विरोधात, बिघडलेले संबंध अलीकडच्या काळातील योगदान; पवारांचा हल्लाबोल

“मला मोदींचा गुरू म्हणून उगीच त्यांना अडचणीत आणू नका”

या देशाची अर्थव्यवस्था वाचवायला मनमोहन सिंगांसारख्या व्यक्तीची गरज- शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या