Top News कोल्हापूर महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांच्या गावात भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत केली आघाडी तरीही सेनेने भगवा फडकलाच

कोल्हापूर | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या गावात म्हणजे कोल्हापूरमधील खानापूरमध्ये सोयीची आघाडी झाल्याने या निकालाकडे लक्ष लागून होतं. भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली होती. मात्र तरीही शिवसेनेने आपला भगवा फडकावला आहे.

प्राथमिक कलांमध्ये गावातील सहा जागांवर शिवसेनेनं भगवा फडकवला आहे. शिवसेनेचा पराभव करण्यासाठी तीनही पक्षांमधील स्थानिक नेते एकत्र आले होते. मात्र शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांनी विजय खेचून आणला आहे. खाणापूरमध्ये नऊ जागा आहेत. त्यातील सहा जांगावर शिवसेनेने विजय मिळवला आहे.

भाजपचा सर्वात मोठा राजकीय शत्रू असले्ल्या शिवसेने विजय मिळवल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची मदत घेतली होती. या आघाडीविरोधात शिवसेना एकटी लढली.

दरम्यान, चंद्रकांत पाटलांच्या गावात झालेल्या या सोयीच्या आघाडीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र निकालाने शिवसेना तिन्ही पक्षांच्या वरचढ निघाली आहे.

थोडक्यात बातम्या-

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ठरले आहेत”

अजित पवार साहेब, जे जमणार नाही ते बोलू नका, कारण… -निलेश राणे

“धनंजय मुंडेंबाबत विरोधकांनी राजकारण करु नये

ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर! कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादीला धक्का

“धनंजय मुंडेंविरोधात बोलशील तर तुझ्या डोक्यात सहा गोळ्या घालेल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या