बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, जाणून घ्या ताजी आकडेवारी

मुंबई | संपूर्ण राज्यभरात कोरोना महामारीने थैमान घातलं होतं. त्यातच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनेही महाराष्ट्रभर हाहाकार माजवला होता. परंतु ही रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात येत असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे.

आज दिवसभरात संपूर्ण महाराष्ट्रात 686 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 912 कोरोना रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. तसेच दिवसभरात 19 कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात 11 हजार 943 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत . त्याचबरोबर आतापर्यंत 66 लाख 24 हजार 986 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 64 लाख 68 हजार 791 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 1 लाख 40 हजार 602 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची आकडेवारी स्पष्ट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण राज्यात 6 कोटी 40 लाख 52 हजार 219 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या

“एकेकाळी सत्तेत असलेले लोक हे करतायेत, हे दुर्दैव आहे”

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून शरद पवारांचा सरकारला एका वाक्याचा सल्ला, म्हणाले…

अमरावती आणि पुण्यापाठोपाठ आता ‘या’ शहरातही जमावबंदी लागू

“विक्रमजी, आपल्या वयाचा आदर आहे, मात्र…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More