बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात लागू शकतो ‘इतक्या’ दिवसांचा लॉकडाऊन; महत्त्वाची माहिती आली समोर

मुंबई | कोरोनामुळे महाराष्ट्राची परिस्थिती सध्या अवघड बनत चालली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे आकडे वाढतच चालले असून कडक पावलं उचलण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलं आहे. त्यासाठी आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली होती, यामध्ये राज्यात विकेंड लॉकडाऊन घेण्याची घोषणा करण्यात आलेली आहे.

सध्याची स्थिती पाहता मुख्यमंत्री लॉकडाऊन लावण्यावर ठाम असल्याचं समजत आहे.  मात्र अर्थचक्र बिघडू नये अशी सर्वांची इच्छा होती, त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊन लावण्याऐवजी विकेंड लॉकडाऊन लावण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. दर आठवड्याच्या शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच राज्यातील जनतेसोबत संवाद साधला होता. यावेळी त्यांनी लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं. लॉकडाऊन अपरिहार्य असल्याचं त्यांच्या बोलण्यातून यावेळी जाणवत होतं. आपण विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलून लवकर यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय झाला आहे. विकेंड लॉकडाऊन म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा >>> राज्यात विकेंड लॉकडाऊन, असं असेल लॉकडाऊनचं स्वरुप

थोडक्यात बातम्या-

“तुमचे चेहरे पाहून जगात कोरोना नसल्याची खात्री पटली, मीही मास्क काढून बोलतो”

महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा कोरोनाचं नवं हॉटस्पॉस्ट; एकाच दिवसात 10 हजार रुग्ण!

राहुल तेवतियाचा खतरनाक अंदाज, नेट प्रॅक्टिसचा व्हिडीओ तुफान व्हायरल

अवघ्या 12 वर्षांच्या मुलानं केली आत्महत्या, कारण ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही!

आयुष्याच्या संघर्षाला कंटाळला; पत्नी आणि दोन मुलांना संपवून लिहिली धक्कादायक सुसाईड नोट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More