नागपूर महाराष्ट्र

मतदान जास्त झाल्याने नक्षलवाद्यांनी भ्याड हल्ला केला- सुधीर मुनगंटीवार

गडचिरोली | महाराष्ट्र दिनी गडचिरोलीतील दादापूर येथे जांभूरखेडा गावाजवळ भुसुरुंग स्फोट घडवून आणला आहे. हा हल्ला जास्त मतदान झाल्याने घडवला असावा, अशी प्रतिक्रिया राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

गडचिरोलीच्या जनतेने नक्षलवादयांच्या दहशतीला न घाबरता मतदान केले. गडचिरोलीच्या दुर्गम भागात लोकांनी मोठया हिमतीने मतदान केले, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

बुधवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास ‘जलद प्रतिसाद पथका’तील जवान खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात असताना कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळील पुलावर नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवला.

एकीकडे लोकशाहीच्या विजयासाठी मतदान केंद्रावर लोकं रांगेत थांबून मतदान करतात आणि दुसरीकडे नक्षली विचार घेऊन लोकशाही उद्धस्त करण्याचा प्रकार हा नक्कीच आमच्यासाठी चिंतेची बाब आहे, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या