अकोला | आपण आपल्या लग्नात किंवा आनंदाच्या क्षणी डीजे लावून मिरवणूक काढतो. मात्र अकोल्यात एक अंतयात्रेला डीजे लावण्यात आला. ही अंतयात्रा महाराष्ट्राचा सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊत अवघ्या वयाच्या 22व्या वर्षी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या खेळाडूची होती.
अंतयात्रा चालू असताना डीजे वाजत होता. प्रणवच्या कुटूंबीयांनी हंबरडा फोडला होता. लोकांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. लोक एकमेकांना धीर देत होते. नुकत्याच दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रणवने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं होतं.
शुक्रवारी अकोला येथील शास्त्री स्टेडियम जवळ असलेल्या ‘क्रीडा प्रबोधनी’मध्ये प्रणवने गळफास लावून आत्महत्या केली होती. प्रणवनं आत्महत्येपुर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. बाबा मला माफ करा, मी तुमचे स्वप्न पूर्ण केलं नाही. माझी अंत्ययात्रा डीजेच्या तालावर निघावी, असं त्यानं चिठ्ठीत लिहिलं होतं.
एकीकडे प्रणवच्या आत्महत्येबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात होतं. अशातच त्याच्या अंतयात्रेला डीजे लावण्यात आल्यानं सध्या या घटनेटी अकोल्यात चांगलीच चर्चा आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
नरेंद्र मोदी सत्तेत असेपर्यंत भारत-पाक सामना होणार नाही- शाहिद आफ्रीदी
माळेगाव निवडणूक: अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला, विरोधकांचा मतमोजणीवर आक्षेप
महत्वाच्या बातम्या-
भाजपच्या ‘या’ नेत्याचा जातीचा दाखला रद्द?; खासदारकी धोक्यात
माळेगाव निवडणूक: अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला, विरोधकांचा मतमोजणीवर आक्षेप
चंदनतस्कर विरप्पनच्या मुलीनं हाती घेतलं कमळ!
Comments are closed.