बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असतानाच आज रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं आहे.

आज दिवसभरात राज्यात 10  हजार 458 रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर 8 हजार 992 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. याशिवाय राज्यात दिवसभरात 200 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 59,00,440 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 96 टक्के एवढं झालं आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के एवढा आहे.

दरम्यान, संपुर्ण महाराष्ट्रासह पुण्यातही कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं असल्याचं दिसून आलं होतं. आज दिवसभरात पुण्यातुनही मोठ्या प्रमाणात दिलासादायक चित्र पाहायला मिळालं.

 

थोडक्यात बातम्या-  

वडेट्टीवार चंद्रपूरमधील बार-मालकांसाठी बनले ‘देवमाणूस’; दारूबंदी उठवल्यानंतर वडेट्टीवारांची पूजा करतानाचा व्हिडीओ व्हायरल!

राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

मोठी बातमी! सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत राज्य सरकारने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

“मंत्रिमंडळात कुणाला घ्यावं आणि कुणाला थांबवावं हा मोदींचा अधिकार”

गरोदर महिलांसाठी कोरोना लस सुरक्षित – डॉ. वीके पॉल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More