महाराष्ट्र 1 हजार अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था होणार, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

दावोस | येत्या सात ते आठ वर्षात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 हजार अब्ज डॉलर्सची होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी बोलत होते.

राज्याचा जीडीपी सध्या सुमारे 400 अब्ज डॉलर्सचा आहे. त्यात दरवर्षी सुमारे 10 टक्क्यांची वाढ होते. परदेशी कंपन्यांसमोर हे वास्तव मांडल्याने अनेक कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास अनुकूलता दाखवली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, दावोसमधील परिषदेत कोका कोलाचे सीईओ जेम्स क्विन्सी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच राज्य सरकारसोबत विविध क्षेत्रात सहकार्य करण्याचे मान्य केले.