‘महाविकास आघाडी सरकारनं ओबीसींच्या…’; फडणवीसांचा गंभीर आरोप
मुंबई | ओबीसी आरक्षणाच्या मुद्दानं पुन्हा एकदा तोंड वर काढलं आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याच्या मुद्यावरुन राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
ओबीसी आरक्षणाविना निवडणुका होत आहेत. हे राजकीय आरक्षण गेलेले नाही तर महाविकास आघाडी सरकारनं ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा कत्तल केला आहे, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर केला आहे.
सरकारला कोर्टानं सात वेळा तारीख देऊनही कार्यवाही पूर्ण केली नाही. नंतर यांच्या खोट्या सबबींवर तारीख देण्यास कोर्टानं नकार दिला, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडीचे मालक कधीच ओबीसींना आरक्षण मिळू देणार नाहीत, असा आरोपही फडणवीसांनी केलेला पहायला मिळाला.
थोडक्यात बातम्या –
“राज्यात भोंग्याचं नाही तर भोंगळं राजकारण सुरू आहे”
“बाळासाहेबांची शिकवण आणि पवार साहेबांची सोबत, इकडची दुनिया तिकडे करू”
“उद्धव ठाकरे तुम्ही सुखाने नांदा, पण होऊ देऊ नका तुमचा वांदा”
नवनीत राणांच्या भेटीनंतर चित्रा वाघ संतापल्या, म्हणाल्या…
प्राजक्ता माळीचा बोल्ड अंदाज, बिनाब्लाऊजच्या साडीत बघून नेटकरी संतापले
Comments are closed.