बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बिग बॉसच्या दोन भागांसाठी मांजरेकरांना मिळतात इतके लाख; मानधन ऐकून व्हाल थक्क

मुंबई | बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला काही आठवड्यांपूर्वीच सुरूवात झाली. अगदी पहिल्या आठवड्यापासून बिग बॉसचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मराठी बिग बॉसच्या गेल्या दोन सिझन प्रमाणे यंदाही बिग बॉसचं सुत्रसंचलन अभिनेते आणि निर्माते महेश मांजरेकरच करत आहेत. बिग बॉसच्या स्पर्धकांसह मांजरेकरांचं सुत्रसंचलनही प्रेक्षकांना आवडतं.

शनिवार आणि रविवारच्या भागात महेश मांजरेकर बिग बॉसचे स्पर्धक आणि प्रेक्षकांच्या भेटीला येतात. आठवड्यातील या दोन दिवसांसाठीच महेश मांजरेकर यांना लाखो रूपयांचं मानधन मिळतं. महेश मांजरेकर यांना शनिवार आणि रविवारच्या भागांचं सुत्रसंचलन करण्यासाठी तब्बल 25 लाख रूपयांच्या जवळपास मानधन मिळतं.

महेश मांजरेकरांनी बिग बॉस मराठीच्या पहिल्या दोन पर्वांचं सुत्रसंचलन केलं. तिसऱ्या पर्वाची घोषणा झाल्यानंतर महेश मांजरेकर या पर्वात दिसणार का याबद्दल सर्वांनाच शंका वाटत होती. कारण मांजरेकरांवर काही दिवसांपूर्वीच कर्करोगाची शस्त्रक्रिया पार पडली. त्यामुळे मांजरेकर या पर्वात येणार की नाही? असा प्रश्न बिग बॉसच्या चाहत्यांना पडत होता.

पण मांजरेकर नव्या लूकसह बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाचं देखील सुत्रसंचलन करत आहेत. गेल्या 2 सिझनमध्ये मांजरेकर वीकेंड का वार मधून बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना भेटत होते. तर या नवीन सिझनमध्ये शनिवारची चावडीमधून स्पर्धकांची शाळा भरवतात. या सिझनच्या 2 भागांसाठीच मांजरेकरांना 25 लाखांचं मानधन मिळत आहे. मांजरेकरांचं दोन भागांचं मानधन ऐकून चाहते अवाक झाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

IPL 2021: पराभवानंतर विराट कोहलीला अश्रू अनावर, पाहा भावूक व्हिडीओ

सरकार ‘या’ कर्मचाऱ्यांना देणार पदोन्नती; पगारातही होणार घसघशीत वाढ

नरेंद्र मोदींचा नवीन मास्टर प्लॅन; उद्या लाँच करणार ‘ही’ जबरदस्त योजना

वानखेडे आणि कंबोज यांची भेट तर…; नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट

एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांची पाळत?; व्हिडीओ पुराव्यासहीत वानखेडेंची तक्रार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More