Top News महाराष्ट्र मुंबई

‘देवेंद्रजी, तुम्हाला लवकरच संधी मिळेल’; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं वक्तव्य

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील मेट्रोमध्ये बसलेला फोटा ट्विट केला. फडणवीसांनी त्या ट्विटमध्ये मुंबई मेट्रोतून कधी प्रवास करता येईल?, असा सवाल केला होता.

देवेंद्र फडणवीसांनी हा सवाल करत महाविकास आघाडी सरकारला टोला हाणला होता. फडणवीसांच्या या टोल्याला राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई मेट्रो-3 हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकार पूर्ण करेल यात शंका नाही. मात्र केंद्राकडून वारंवार अडथळा निर्माण केला जात आहे, अशी मुंबईकरांची भावना आहे. त्यामुळे केंद्रासोबत आपण जर संवाद साधलात तर प्रकल्प लवकर पूर्ण होईल, असं महेश तपासे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, केंद्राकडून मदतीऐवजी आडकाठी होत आहे. असे प्रकार थांबले तर मुंबईकरांना लवकर दिलासा मिळेल आणि तुम्हालाही मुंबई मेट्रो-3 मध्ये प्रवास करण्याची आणि फोटो काढून ट्वीट करण्याची लवकरच संधी मिळेल, असंही तपासे म्हणाले.

 

थोडक्यात बातम्या-

“लोकांचा अंत पाहू नका, उद्रेक झाला तर कोण थांबवणार?”

गृहमंत्री जी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता तर…- चंद्रकांत पाटील

भाजपच्या अधिकृत वेबासाईटवर झालेल्या चुकीच्या उल्लेखावर रक्षा खडसे म्हणाल्या…

रक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली

येत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या