बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनसुख हिरेन मृत्युप्रकरणी एनआयएची मोठी कारवाई; पोलीस निरीक्षक सुनिल माने यांना अटक

मुंबई | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. गृहमंत्र्यावर याप्रकरणी आरोप झाले होते. या प्रकरणाचा तपास पुढे राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने हाती घेतला होता. त्यानंतर एनआयएने धडक कारवाई चालू केली होती. एनआयएने मुख्य आरोपी सचिन वाझे यांना अटक केली होती. त्यानंतर आता एनआयएने पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक आहे.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात कांदिवली क्राईम ब्रांच युनिटचे माजी पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने सुनील माने यांना बेड्या ठोकल्या. सुनील माने हे मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांच युनिट 11 चे माजी पोलीस निरीक्षक आहेत. गेल्या महिन्यात सुनील माने यांची दहशतवाद विरोधी पथकाच्या म्हणजेच एटीएसच्या काळाचौकी युनिटमध्ये चौकशी करण्यात आली होती.

मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी आपल्या पतीला कांदिवली क्राईम ब्रांचमधून फोन आला होता, आणि चौकशीसाठी बोलावलं होतं, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आला होता. पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार हत्येपूर्वी हिरेन यांच्या चेहऱ्यावर मार लागलेला होता. त्यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला मार लागलेला होता. मृत्यूपूर्वी हा मार लागलेला होता. तसेच त्यांच्या अंगावर काही ठिकाणी मार होता. विशेषत: डोक्यालाही मार लागलेला होता,अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान,एनआयएच्या तपासानंतर आता सचिन वाझे आणि सुनील माने यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. हिरेन यांची हत्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या समोरच करण्यात आली, अशी माहिती देखील समोर येत आहे.

थोडक्यात बातम्या-

‘विरारमधील घटना ही काही नॅशनल न्यूज नाही’; राजेश टोपेंचं धक्कादायक वक्तव्य

“महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू, राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे”

केंद्र सरकारची बाजू मांडत देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीतील मंत्र्यांना दिला ‘हा’ सल्ला

विरार रुग्णालय दुर्घटनेबद्दल नरेंद्र मोदींकडून दु:ख व्यक्त; नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर

कडक लॉकडाऊनसंदर्भात तुमच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे वाचा एकाच ठिकाणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More