बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सिनेमात सेक्स दाखण्यापेक्षा पॉर्न फिल्मच बनवा- गोविंदा

मुंबई | बॉलिवूडमधील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्रा गोविंदाने कधीकाळी चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घातला होता. फक्त अभिनयच नाही तर त्याची स्टाईल, त्याचा डान्स अशा बऱ्याच गोष्टींमुळे लोक गोविंदाकडे आकर्षित होत होते. 80 ते 90 च्या दशकात गोविंदा नंबर वन हिरो होता. मात्र नंतर त्याला नेपोटिझममुळे काम मिळणं बंद झालं. या बद्दल स्वतः गोविंदाने देखील कबुली दिली आहे.

सध्या चित्रपट सुपरहिट व्हावा यासाठी त्यामध्ये अनेक सेक्स सिन्स दाखवले जातात. अशाच काही ऑफर्स गोविंदाला देखील आल्या होत्या. मात्र त्याने त्यांना नकार दिला. यादरम्यान त्याने हसत हसत त्याच्या मनातील गोष्टी बोलून दाखवल्या. सेक्स सिन्स दाखवण्यापेक्षा पॉर्न फिल्मच बनवा, असं त्याने म्हटलं आहे. नियमांमध्ये राहून आपण नेहमी काम केलं आहे, असंही त्यानं म्हटलंय.

आपल्या नियमांपलिकडे न जाता काम करुन त्याच ताकदीवर आपण यश मिळवलं असल्याचं गोविंदाने मुलाखती दरम्यान सांगितलं आहे. जास्त प्रमाणात बोल्ड सिन्स असलेल्या चित्रपटांच्या ऑफर्स आल्यावर गोविंदाने त्यांना नकार देणं योग्य समजलं. तसेच बॉलिवूड एका कुटुंबासारखं आहे. तिथे सगळ्यांसारखं वागलं तर तुम्ही चांगले ठरता, असंही त्यानं सांगितलं.

दरम्यान, बॉलिवूडमधील घराणेशाहीचा दणका सुपरहिट हिरो गोविंदा देखील बसला आहे. अनेक कलाकारांनी कित्येक वर्षांपासून केलेली मेहनत आणि प्रसिद्धी या नेपोटिझममुळे खाक झाल्याचं जाहीर केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता

शिवसेनेकडून नव्या प्रवक्त्यांच्या नावांची घोषणा, ‘या’ 16 जणांना मिळाली संधी

मिठाच्या खड्यावरुन राजकारण तापलं; सामनाच्या अग्रलेखातून अजित पवारांना कानपिचक्या

शिवसेना का सोडली?; नरेंद्र पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

“सॅम करनमध्ये मला महेंद्रसिंग धोनीची झलक पहायला मिळते”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More