उस्मानाबाद | पार्थ पवार इममॅच्युअर आहेत. त्यांच्या मतांना आम्ही कवडीची किंमत देत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांना फटकारलं होतं. त्यानंतर विविध पक्षातल्या अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच पार्थ यांना थेट आजोळातून समर्थन मिळालं आहे.
पार्थ तुम्ही जन्मत: फायटर आहात, अशी पोस्ट नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले पद्मसिंह पाटील यांचे नातू मल्हार पाटील यांनी फेसबुकवर केली आहे. त्यांची ही फेसबुक पोस्ट खूपच सूचक मानली जात आहे.
तुम्ही जन्मत: फायटर आहात आणि मी ते लहानपणापासून पाहिलं आहे. मला तुमचा अभिमान आहे. आपण उस्मानाबादचे आहोत आणि लढायचं कसं हे आपल्याला माहित आहे, असं मल्हार पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पाटील-पवार यांच्यातील नातेसंबंध
अजित पवार यांच्या पत्नी आणि पार्थ पवार यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार या पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत. अजित पवार आणि डॉ. पद्मसिंह पाटील हे नात्याने मेव्हणे आहेत. तर मल्हार पाटील हे तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजित सिंह यांचे चिरंजीव आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमामध्ये
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा
…म्हणून कर्डीले-विखे पाटील एकत्र; घेतली कृषिमंत्र्यांची भेट
Comments are closed.