बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जींची भेट टळली; ‘हे’ कारण आलं समोर

मुंबई | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या मुंबई दौऱ्यात ममता बॅनर्जी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार होत्या. पण उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांची भेट टळली आहे.

ममता बॅनर्जी त्यांच्या या आगामी मुंबई दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत अनेक महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार होत्या. पण ही भेट आता रद्द झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यशस्वी शस्त्रक्रियेनंतर नुकतेच रूग्णालयातून घरी परतले आहेत. तब्येतीच्या कारणामुळे ही भेट रद्द झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शस्त्रक्रियेनंतर आरामाची गरज आहे. याच कारणामुळे ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांची भेट रद्द झाली असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांसोबतची भेट रद्द झाली असली तरी ममता बॅनर्जी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या रिसेप्शन सोहळ्यात हजेरी लावणार आहेत.

गोवा राज्याची निवडणूक आता जवळ आली आहे. त्यात ममता बॅनर्जी, शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार असल्याने राजकीय वर्तुळात नव्या घडामोडींची शक्यता आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा महत्वपुर्ण मानला जात आहे.

 

थोडक्यात बातम्या-

पहाटेच्या ‘त्या’ शपथविधीचा फडणवीसांना पश्चात्ताप, म्हणाले मी पुस्तक लिहून…

‘…आणि दुसरीकडे अजितदादांनी घेतलेल्या निर्णयाला वाटाण्याच्या अक्षदा’

पुणेकरांवर पुन्हा निर्बंध! नियम पुन्हा ‘जैसे थे’च

‘त्या’ व्हायरल डान्स व्हिडीओवर होणाऱ्या टीकेला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

1ली ते 4थी शाळा राहणार बंद?, ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More