बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ममता बॅनर्जी घेणार ठाकरे-पवारांची भेट; राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या

मुंबई | बंगाल विधानसभेच्या निवडणुकीनंतर देशात एक नवीनच राजकिय चित्र निर्माण झाल्याचं पहायला मिळालं होतं. त्यातच देशात सध्या विरोधी पक्षांकडून नरेंद्र मोदींना पर्याय निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांनी नुकतच याबद्दल वक्तव्य केलं होतं. त्यातच  बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत थेट नरेंद्र मोदींना आव्हान देणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ( banagal Cm Mamta Banerjee ) ममता बॅनर्जी लवकरच मुंबई दौरा करणार आहेत.

ममता बॅनर्जी दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्या ग्लोबल बिजनेस समिटसाठी मुंबईला ( Mumbai ) येणार आहेत. विशेष म्हणजे त्या यावेळी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( maharashtra Cm uddhav Thackrey ) यांची भेट घेणार आहेत. राजकिय चर्चेसाठी ही भेट होणार असल्याची चर्चा सध्या राजकिय वर्तुळात रंगली आहे. या भेटीनंतर नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलेलं आहे.

ममता बॅनर्जी 30 नोव्हेंबरला मुंबईत येणार असून 1 डिसेंबरपर्यंत मुंबईत राहणार आहेत. त्यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली होती. त्यानंतर आता त्या शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची देखील भेट घेणार आहेत. मात्र, यावेळी त्यांनी काँग्रेसच्या अतंरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार नाहीत. त्यामुळे ममता बॅनर्जी आणि काँग्रेसमध्ये सर्व काही ठिक नसल्याचं चित्र समोर आलं आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी सध्या पक्षविस्तारासाठी प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधी पक्षातून पर्याय निर्माण करण्याची गरज आहे. विरोधी पक्षाचं नेतृत्व ममता गांधी करतील किंवा दुसरं कोणतरी’ असंही पवारांनी बोलून दाखवलं होतं. त्यानंतर आता ममता बॅनर्जी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट महत्त्वपुर्ण ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“शरद पवार तो काळ गेला”; ॲड. गुणरत्न सदावर्तेंचा पवारांना इशारा

एकेकाळी होती राहुल गांधींसोबत लग्नाची अफवा, आता केला भाजपमध्ये प्रवेश

“सरकारचा निर्णय मान्य आहे का?, सदाभाऊ आणि पडळकरांची फसवणूक झाली”

‘रात्रीस खेळ चाले’तून शेवंताची एक्झिट, जाता जाता सांगितले सिनेसृष्टीतले काळे कारनामे

“ठाकरे सरकारला खानच्या मुलाची चिंता पण पाटलांच्या मुलांची नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More