बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जींचा मोठ्या मताधिक्याने विजय!

कोलकाता | पश्चिम बंगाल मध्ये मागील काही महिन्यांपूर्वी तृणमूल काँग्रेसने मोठा विजय प्राप्त करत भाजपला चारीमुंड्या चीत करत सत्ता काबीज केली आहे. पण निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममध्ये पराभव पत्कारावा लागला होता. त्यानंतर भवानीपूर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत ममतांनी विजय मिळवला आहे.

भवानीपूर मतदार संघातील पोटनिवडणुकीत ममतांनी भाजपच्या प्रियांका टिबरेवाल यांचा दारूण पराभव केला आहे. ममतांनी टिबरेवाल यांच्यावर तब्बल 58 हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने विजय प्राप्त केला आहे. ममतांच्या विजय प्राप्तीनंतर एकच जल्लोष साजरा केला जात आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यलयासह ममतांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी जमा केली आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सकाळपासूनच मतमोजणीच्या फेरीमध्ये आघाडीवर होत्या. आज सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करायला सुरूवात केली होती. या पोटनिवडणुकीत 57 टक्के मतदानाची नोंद झाली होती.

दरम्यान, ममतांनी या आधी आपला बालेकिल्ला असलेल्या भवानीपूरमधून दोन विजय मिळवला होता. त्यामुळं आता ममतांना आपली मुख्यमंत्री पदाची खुर्ची सांभाळण्यासाठी ममतांना त्यांच्या बालेकिल्ल्याचाच आधार घ्यावा लागला आहे.

थोडक्यात बातम्या –

शाहरुखच्या मुलाला ताब्यात घेतल्यानंतर सचिन वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शाहरुखच म्हणाला होता, “माझ्या मुलानं ड्रग्ज घ्यावेत, पोरींच्या मागं जावं, सेक्स करावा”

ठाकरे सरकार गप्प का बसलंय, भूमिका घ्यायला हवी- संजय राऊत

“जेव्हा पण घटस्फोट होतो, तेव्हा दोष नेहमी पुरूषांचाचं असतो”

महाविकास आघाडीमुळं मोठा त्रास, शिवसेना सोडताना ‘हा’ नेता रडला!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More