बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशाला किमान चार राजधान्या हव्यात- ममता बॅनर्जी

कोलकाता | देशाला किमान चार राजधान्या हव्यात, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. त्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होत्या.

भारतात किमान चार रोटेटिंग राजधान्या असायला हव्यात. इंग्रजांनी कोलकाता येथे बसून संपूर्ण देशावर राज्य केलं. देशात एकच राजधानी का आहे?, असा प्रश्नही ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला.

नवीन पीढीला नेताजींबाबत अधिक माहिती नाही. नेताजींच्या मृत्यूचे गूढ उकलले गेले पाहिजे. नेताजी आमच्यासाठी देशनायक आहेत, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

फोडा आणि राज्य करा, याचा नेताजी नेहमी विरोध करायचे. बंगलाच्या भावना बाहेरील व्यक्ती समजून घेऊ शकत नाही. भाजप इतिहास बदलण्याचा विचार करत आहे. नेता तोच असतो, जो सर्वांना सोबत घेऊन जातो, असं मत ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलं.

थोडक्यात बातम्या-

26 जानेवारीपासून येरवडा कारागृहात ‘जेल-पर्यटन’ सुरु होणार- अनिल देशमुख

या देशाला भारत नाही, हिंदूस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच पाहिजे- संभाजी भिडे

‘लोकांच्या प्रेमाचा परिचय कसा येतो याचा काही अंदाज बांधता येत नाही’; पंकजा मुंडे हवा बदलासाठी महाबळेश्वरमध्ये

“बाळासाहेबांची शिवसेना विकली त्या संजय राऊतांनी भाजपला हिंदुत्व शिकवू नये”

‘फडणवीस आणि पाटलांनी पक्ष प्रवेशासाठी 100 कोटींची ऑफर दिली होती’; राष्ट्रवादीच्या आमदाराचा गौप्यस्फोट

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More