देश

ममता बॅनर्जी यांनी मोदींच्यासमोरच ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्यांना झापलं

कोलकाता | मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच ‘जय श्रीराम’च्या देणाऱ्यांना झापलं आहे.

एखाद्याला कार्यक्रमाला बोलवायचं आणि त्याची बेईज्जती करायची हे तुम्हाला शोभत नाही, अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना सुनावलं आहे. त्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. यावेळी ममता बॅनर्जी भाषणाला उभ्या राहताच ‘भारत माता की जय’ आणि ‘जय श्रीरामचे नारे’ सुरू झाले. त्यामुळे ममता बॅनर्जी या प्रचंड भडकल्या.

हा शासनाचा कार्यक्रम आहे. एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही. हा सर्व पक्षीय आणि पब्लिक प्रोग्राम आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या-

‘आजचा दिवस हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण’; पुतळ्याच्या अनावरणानंतर उद्धव ठाकरे भावूक

बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं थाटात लोकार्पण

मुंबईत दिग्गजांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेंच्या हस्ते बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण!

“शशिकांत शिंदेंचा शंभर कोटींचा दावा हा सर्वात मोठा राजकीय विनोद”

‘रेणू शर्मावर गुन्हा दाखल करा’; चित्रा वाघ यांनी घेतली विश्वास नांगरे पाटलांची भेट

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या