बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर प्राणघातक हल्ला!

टोकियो | जपानचे माजी आणि दिर्घकालीन पंतप्रधान शिंजो अबे हे नारा शहरात निवडणूक प्रचारसभेला संबोधित करत असताना, टेटसुयो यमागामी या 40 वर्षीय नागरीकाने त्यांच्यावर गोळीबार केला. अबे त्याचक्षणी जमिनीवर पडले आणि त्यांच्या छातीतून रक्तस्त्राव सुरु झाला. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

टेटसुयो यमागामीला घटनास्थळी पोलिसांनी अटक करत त्याला निरीच्या निशी पोलीस स्थानकात नेलं. त्यांनी त्याच्याजवळून घरघुती बनावटीचे पिस्तुल हस्तगत केले आहे. पोलिसांना कबुली देताना यमागामी म्हणाला, तो शिंजो अबे यांच्यावर त्यांच्या कामकाजावर नाराज होता. म्हणून त्याने त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. जपानी वृत्त संस्था एनएचके नुसार टेटसुयो यमागामी हा मरीटाईम सेल्फ डिफेन्स फोर्समध्ये 2005 पर्यंत तीन वर्षे कार्यरत होता.

जपानी वृत्त संस्था एनएचकेच्या एका पत्रकार महिलेने दोन गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकल्याचं म्हटलं. आणि त्यानंतर अबे जमिनीवर कोसळले. त्यांच्या भोवती तात्काळ सुरक्षा रक्षकांनी घोळका केला. युको ओईकावा ह्यांनी घटनेचा व्हिडीओ देखील कॅमेऱ्यात कैद केला आहे. त्यात टेटसुयो यमागामी संशयास्पद हालचाली करताना दिसत आहे.

दरम्यान टेटसुयो यमागामीला पोलिसांनी ताबडतोब धरुन जमिनीवर बसवले. अधिकारी वर्ग युद्धपातळीवर आरोपीची चौकशी करत आहेत. त्याचा या हत्येच्या प्रयत्नामागचा हेतू अद्याप अस्पष्ट आहे. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशीदा यांना ही बातमी कळताच त्यांनी तात्काळ टोकियोला प्रस्थान केलं. जपानच्या वार्तांकनानुसार शिंजो अबे यांना गोळ्या लागल्यानंतर लचेचत कॅरेडीक अरेस्टचा झटका आला.

थोडक्यात बातम्या – 

‘…म्हणून आमदार शिवसेनेतून भाजपात गेले’, छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

‘घरात घुसून मारलं होतं ना?’, कंगना रनौतने पुन्हा करण जोहरला डिवचलं

‘उद्धवजी अजूनही वेळ गेलेली नाही’, शिंदे गटाची उद्धव ठाकरेंना साद

ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट राज्यात सक्रीय, ‘इतके’ रूग्ण आढळल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ

‘…तर नव्या चिन्हाचीही तयारी ठेवा’, उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More