Top News देश

कटकट बंद करा!; बिग बींच्या आवाजातील त्या काॅलरट्यूनविरोधात जनहित याचिका

मुंबई | लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना सतर्क ठेवण्यासाठी कॉलर ट्यून सुरू केली.  पण आता जवळ जवळ 10 महिने उलटून गेले तरी कॉलर ट्यून चालू आहे. आता मात्र नागरिक त्रस्त झाले आहेत.

नमस्कार आज हमारा पूरा देश और विश्व कोरोनाकी चुनौती का सामना कर रहा हैं…, हे शब्द वाक्य आपल्या कानावर पडतात. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजात ही कॉलर ट्यून आहे. मात्र या  कॉलर ट्यून विरोधात दिल्ली हायकोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे.

एखादा महत्वाचा फोन कॉल करायचा असला तरी आधी ही कॉलर ट्यून आपल्याला ऐकावी लागते. त्यानंतर तुमचा फोन लागतो. सोशल माध्यमांवर या कॉलर ट्यूनवरून बरचशे मीम्स आपल्याला पाहायला मिळतात. अशातच एनएनआय वृत्तसंस्थेने या जनहित याचिकेबद्दल ट्विटरवरुन माहिती दिली आहे.

दरम्यान, बच्चन यांना एका ट्विटर युजरने ही कॉलर ट्यून कधी बंद होणार आहे?, असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना बच्चन म्हणाले होचते की, माझं काम फक्त  व्हॉइस ओव्हर देण्याचं असतं. कॉलर ट्यून किंवा एखादी जागहिरात कधी बंद करणार हे माझ्या हातात नसतं.

थोडक्यात बातम्या-

“2024मध्ये काँग्रेसला एका बसमध्ये बसवून नेता येईल येवढेच खासदार मिळणार”

“राणा दाम्पत्य म्हणजे नाटक कंपनी”

“छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नाही पण औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावं”

मोठी बातमी! पोलीस भरतीबाबतचा ‘तो’ वादग्रस्त जीआर अखेर रद्द

ऐतिहासिक! पुरूष कसोटी सामन्यात पहिल्यांदाच दिसणार महिला अंपायर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या