आघाडीला ‘राज’ साथ देणार का? अजित दादांचं आमंत्रण स्विकारणार?

मुंबई |  मतांचं विभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवं असं म्हणतं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आघाडीत सामिल होण्याचं निमंत्रण काय दिलं आणि चर्चांना उधाण काय आलं….

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज ठाकरे आघाडीत सामिल होणार नाहीत, असं वक्तव्य करत यावर पडदा टाकला होता. मात्र अजित पवारांनी यावर आपलं मत व्यक्त करत पुन्हा नव्याने आघाडीचे संकेत दिलेत.

मनसेच्या आघाडीतल्या प्रवेशाने महाराष्ट्रातल्या राजकीय पटलावर एका नव्या युगाची सुरू होतीय, अशी जोरदार चर्चा आहे. राज ठाकरे यावर काय निर्णय घेणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

अजित पवारांचं आमंत्रण ‘राज’ स्विकारणार का? आणि आघाडीत पाऊल टाकणार का? हेच पाहायचंय.

महत्वाच्या बातम्या-

मोदी सरकारचा राफेल करार यूपीएपेक्षा स्वस्त; ‘कॅग’चा अहवाल

शरद पवारांच्या नुसत्या नावानं ‘माढ्यातलं’ वातावरण झालंय टाईट!

सोशल मीडियाचा वापर वाढवा; प्रियांका गांधींचा काँग्रेस नेत्यांना सल्ला

मोदी पुन्हा जिंकतील का? मोदींचा भाऊ म्हणतो…

-बेडकाने कितीही फुगले तरी बैल होत नाही; धनंजय मुंडेंचा फडणवीसांवर पलटवार

Google+ Linkedin