मुंबई | येशू ख्रिस्ताने पूल बांधले भिंती नाहीत, मनोहर पर्रिकर ती व्यक्ती आहे जी पूल बांधते, असं म्हणत गोव्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री पर्रिकरांची तुलना थेट येशू ख्रिस्ताशी केली आहे.
मांडवी नदीवर अटल सेतू पुलाचं काम पूर्ण झाल्याने विधानसभेत मनोहर पर्रिकरांसाठी अभिनंदन ठराव मांडण्यात आला होता. यावेळी सरदेसाई यांनी हे वक्तव्य केलं आहे.
बायबलमध्ये सांगितलं आहे की माणसाने भिंती नाही तर पूल बांधायला हवे. येशू ख्रिस्ताने पूल बांधले भिंती नाही आणि पर्रिकर तेच करत आहेत, असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, पर्रिकरांच्या हस्ते रविवारी या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
-निलेश लंकेंनी ‘साधलं टायमिंग’!, प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
–विधानसभेसाठी रोहित पवार कर्जत-जामखेडमधून?, धनंजय मुंडेंनी दिले संकेत
–माझ्या अंदाजांना मटका म्हणणाऱ्यांची कीव येते, तर दानवेंचा पराभव होणारच!
–हिंदू महासभेची वेबसाईट हॅक; केरला सायबर वॉरिअर्सनं घेतला बदला
–काय ‘भावना’ कसं आहे?, पाहा मोदींच्या प्रश्नावर काय म्हणाल्या शिवसेना खासदार…