नवी दिल्ली | देशव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ कालपासून झाला. लस सुरक्षित आहे की नाही त्यासाठी ही लस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली घ्यावी, अशी मागणी होत होती. अशातच काँग्रेस नते मनीष तिवारी यांनी केंद्रातील मंत्र्यांना सवाल केला आहे.
कोव्हॅक्सिन ही लस सुरक्षित आणि परिणामकारक आहे, असं जर केंद्र सरकार वारंवार सांगत आहे तर सरकारपैकी कोणाही मंत्री वा नेत्याने ही लस स्वत:ला का टोचून घेतली नाही, असा सवाल काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी केला आहे.
राष्ट्रवादाच्या मागे लपत नेत्यांनी लोकांनाच ही लस घेण्यास भाग पाडल्याचं म्हणत तिवारींनी टीका केली आहे. नॉर्वेमध्ये फायझरच्या लसीमुळे 23 जणांचा मृत्यू झाला, यावरही तिवारी यांनी भाष्य केलं.
दरम्यान, काल देशभरात लसीकरणाच्या माहिमेला सुरूवात झाली आहे. तर कोरोना लसीवर कोरोना योद्ध्यांच्या पहिला हक्क असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले
थोडक्यात बातम्या-
…म्हणून पुढचे 2 दिवस मुंबईसह राज्यात कोरोना लसीकरण बंद राहणार!
IAS सुनील केंद्रेकर यांचा साधेपणा; पत्नीसह केंद्रेकर दिसले आठवडी बाजारात
‘…त्यावेळी आम्ही कोरोनावरील लस घेऊ’; राजनाथ सिंह यांनी सांगितली वेळ
“…तर अधिवेशनाच्या पहिल्याच भाषणात मी त्यांचं मोठ्या मनाने अभिनंदन करेल”
मी आज अत्यंत आनंदी आणि समाधानी आहे- केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन