बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भगवे वस्त्र चढवून हातात हनुमानाची मुर्ती घेतली म्हणजे काही…”

नवी दिल्ली | खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी आज दिल्लीतील प्रसिद्ध हनुमान मंदिरात जाऊन महाआरती व हनुमान चालिसा पठण केलं. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नवनीत राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) आणखी एकदा निशाणा साधला.

दिल्लीत हनुमान चालिसा पठण करण्यापूर्वी नवनीत राणांनी भगवे वस्त्र धारण करून हातात हनुमानाची मुर्ती घेतलेला एक फोटो शेअर केला होता. या फोटोवरून शिवसेनेने (Shivsena) सडकून टीका केली आहे.

अंगावर भगवे वस्त्र चढवले, हातात हनुमान मुर्ती घेतली म्हणजे तू हिंदूंची नेता झाली हा गैरसमज काढ बाई, अशा शब्दात शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यानी नवनीत राणांना सुनावलं आहे. कायंदे यांनी ट्विट करत नवनीत राणांना फैलावर घेतलं आहे.

दरम्यान, ठाकरेंना हिंदुत्व शिकवण्याची हिंमत करू नको. अन्यथा तू म्हणते तशी यापुढे 14 दिवस नाही तर 14 वर्षे…, असा इशारा देखील मनिषा कायंदे यांनी दिला आहे. नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर राणा दांपत्य विरूद्ध शिवसेना वाद अधिक तीव्र होताना दिसत आहे.

 

थोडक्यात बातम्या-

‘विखारी आकसापोटी अशी गरळ ओकण्याआधी…’; अमोल कोल्हे संतापले

उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट; ‘सरसेनापती हंबीरराव’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर

‘उद्धव ठाकरे म्हणजे…’; नवनीत राणांच्या वक्तव्याने खळबळ

“बूस्टर डोस नाही पण आमचा प्युअर मास्टर ब्लास्टर डोस असतो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More