माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बंधूंचा काँग्रेसला रामराम; ‘या’ पक्षात केला प्रवेश
अमृतसर | काँग्रेसला सोडचिट्ठी देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. अशात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे बंधू एस एस कोहली यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केलाय.
एस एस कोहली यांच्या सोबत काँग्रेस मजदूर विभागाचे अध्यक्ष साहिब सिंग, माजी बँक पदाधिकारी जे.एस.बिंद्रा, तरसेम सिंग रानीके, मंजीत सिंह वडाली बूटा सिंंग संगतपुरा, निशान सिंग ग्रिडिंग, मजार सिंग, मणी ब्लू सिटीचे राजकुमार अणि कन्हैया इत्यादी नेत्यांनी आपमध्ये प्रवेश केल्यानं पंजाब काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.
अमृतसरचे माजी महापौर ओम प्रकाश गब्बर यांनी देखील आप मध्ये प्रवेश केला आहे. ओम प्रकाश गब्बर सर्वप्रथम अकाली दलाचे नगरसेवक होते. त्यानंतर 2017 साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. गब्बर हे वाल्मिकी धूना साहिब मॅनेजमेंट ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.
दरम्यान, गुजरातमधील सुरत येथे नुकत्याचं पार पडलेल्या महापालिका निवडणूकीत 15 जागा जिंकत आप हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे आम आदमी पार्टी सध्या भारतीय राजकारणात स्वत: चं अस्तित्व सिद्ध करत आहे.
थोडक्यात बातम्या-
मुकेश अंबानींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याने मुंबईत हायअलर्ट
छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणारे गृहमंत्री पूजा चव्हाण प्रकरणावर गप्प का?- देवेंद्र फडणवीस
“मोदी हे महान आहेतच त्याविषयी शंका घेण्याचं कारण नाही, पण…”
नाना पटोलेंचा राष्ट्रवादी, शिवसेनेला इशारा, म्हणाले…
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण!
Comments are closed.