पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये मला राम दिसतो; भाजप खासदार मनोज तिवारींची मोदींवर स्तुतिसुमनं

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये मला रामाची झलक दिसते, असं दिल्ली भाजपचे अध्यक्ष खासदार मनोज तिवारी यांनी म्हटलं आहे. ‘इंडिया टुडे’शी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

दिल्लीमध्ये एक दृष्ट प्रवृत्तीचा व्यक्ती असून तो मला राक्षस प्रवृत्तीचा वाटतो, अशा शब्दात त्यांनी नाव न घेता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रावणाची उपमा दिली. 

मनोज तिवारी लव-कुश रामलीलामध्ये अंगदची भूमिका निभावणार आहेत. यावेळी त्यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. 

दरम्यान, भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना नुकतंच विष्णूचा अकरावा अवतार म्हणून संबोधलं होतं. 

महत्त्वाच्या बातम्या-

-लातूरमधील 19 वर्षीय तरूणीच्या हत्या प्रकरणाला आता नवं वळण

-‘कमल का फूल, बडी भूल’ नारा देणारा भाजपचा मोठा नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार!

-रायगडमध्ये राष्ट्रवादी संपली, शेतकरी कामगार पक्ष संपत चालला आहे!

-शिवसेनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दिल्लीश्वरांकडे साकडं!

-राजू शेट्टी महान माणूस; त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं- सदाभाऊ खोत

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या