बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! सचिन वाजेंबाबत हिरेन यांच्या पत्नीने केला धक्कादायक खुलासा

मुंबई | देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर 25 फेब्रुवारीला एक स्फोटकाने भरलेली कार उभी होती. त्या कारचे मालक मनसुख हिरेन यांची चौकशी चालू होती. मात्र या चौकशीदरम्यान मनसुख हिरेन यांची मृतदेह आढळला. अचानक मृतहेद आढळल्याने अनेक प्रश्न उपस्थित राहिले. गृहमंत्र्यांनी हा तपास मुंबई पोलिसांकडे न देता एटीएसकडे दिला आहे. एटीएसने मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांची चौकशी केली. या चौकशीवेळी विमला हिरेन यांनी धक्कादायक असे खुलासे केले आहेत.

3 मार्चला माझे पती मनसुख हिरेन नेहमीप्रमाणे दुकानावर गेले आणि रात्री दुकान बंद करून परत घरी आले. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की, सीआययूचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाजे मला बोलत आहे की तु अटक हो, दोन-तीन दिवसात मी तुला जामिनावर बाहेर काढतो. मी त्यावेळी हिरेन यांना सांगितलं की, तुम्ही अटक होण्याची काही गरज नाही. आपण कोणाकडून काहीतरी सल्ला घेऊन आणि करून निर्णय घेऊयात. त्यावेळी हिरेन थोडे टेन्शनमध्ये असल्याचं दिसत असल्याचं विमला हिरेन यांनी जबाबात स्पष्ट केलं आहे.

4 मार्चला मनसुख हिरेन यांनी माझ्या फोनवरून माझे दीर विनोद यांची पत्नी सुनिता यांना फोन लावला. त्यावेळी त्यांनी मला कदाचित अटक होईल वकीलांशी माझा अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी बोलणं करून ठेव असं सांगून ते दुकानात गेले असल्याचंही विमला हिरेन एटीएसला दिलेल्या जबाबात म्हटलं आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सचिन वाझे यांच्यावर टीका करताना अनेक आरोप केले आहेत.

थोडक्यात बातम्या-

अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्यावर रोहित पवारांचं ट्विट; म्हणाले…

“अध्यक्ष महोदय मी दुखावलो गेलोय, राहुल गांधीना शाळेत पाठवण्यात यावं”

पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्यावर अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांचं मोठं वक्तव्य!

…अन् भरबैठकीत नाना पटोले संतापले; ‘या’ मुद्द्यावरून शिवसेना-राष्ट्रवादीवर व्यक्त केली नाराजी

सख्खे भाऊ पक्के वैरी; आई-वडिलांसमोरच लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More