मुंबई | मराठा आंदोलकांवर नोंदवलेले गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा पोलिस ठाण्यांवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी सरकारला दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
दोन दिवसात नोंदवलेले गुन्हे मागे घ्या, अन्यथा पोलिस ठाण्यांविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर हा इशारा हास्यास्पद असल्याची जोरदार टीका पत्रकार परिषदेतच करण्यात आली.
दरम्यान, या बैठकीत ठोक मोर्चाचे मोजके समन्वयक हजर होते. त्यामुळे राज्यात मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा ठोक मोर्चा असे दोन गट पडल्याचं चित्र दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-नवज्योत सिंग सिद्धूचा शिरच्छेद करणाऱ्यांस 5 लाखांचं बक्षिस!
-मुस्लिम बांधवांनी साजरी केली आगळी-वेगळी ईद
-टायगर सो रहा था; सलमान खान सोशल मीडियावर ट्रोल
-रामाच्या नावावर जी ‘भामटेगिरी’ सुरू आहे ती कायमची थांबावी- उद्धव ठाकरे
-‘आप’ ला मोठा धक्का; आणखी एका नेत्याचा राजीनामा!