बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अशोक चव्हाणांचा राजीनामा मराठा समाज मागेल, भाजप मागणार नाही”

मुंबई | अशोक चव्हाण समाजाला न्याय देऊ शकत नाही, अशी भावना मराठा समाजात निर्माण झाली असेल तर ते त्यांचा राजीनामा मागतील. मी व्यक्तिश: किंवा भाजप अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याची मागणी करणार नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

आम्ही सारथीला एक एकर जागा दिली. आता तिथे आम्ही भवन उभारत आहोत, असे अजितदादा सांगत आहेत. पण ती बिल्डिंग बांधायला 5 वर्ष लागतील. अजितदादा, या 5 वर्षांमध्ये भाडे तत्त्वावर एखाद्या जागेत का होईना पण ‘सारथी’चे कामकाज चालवणार आहात की नाही?, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी केलाय.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरूनही त्यांनी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना सवाल केले आहेत. ओबीसी समाजाचे सर्वेक्षण होऊन अहवाल यायला किती वेळ लागेल हे मंत्री विजय वडेट्टीवार यांना माहिती आहे का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केलाय.

मराठा आरक्षणासंदर्भातील निकालपत्र अभ्यासण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने एक समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल दिला आहे. पण या समितीने दाखल केलेल्या अहवालात आम्ही वारंवार मांडत असलेले निष्कर्षच अधोरेखित केले आहेत, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांची नरेंद्र मोदींवर टीका, म्हणाले…

ह्रदयद्रावक! कोरोनाची लागण झालेल्या नवजात बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

राष्ट्रवादीच्या आमदारानं उडवली संजय राऊतांची खिल्ली, म्हणाले मी तर आता घाबरलो!

सनी शॉटसाठी तयार होत असताना मागून एकाने…; व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More