Top News

उस्मानाबादमध्ये मराठा आंदोलकांवर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल

उस्मानाबाद | मराठा समाजाच्या बंद दरम्यान दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. पोलिसांनी याप्रकरणी मराठा तरुणांची धरपकड सुरु केली असून धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

एकूण 50 ते 60 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील 9 जणांना रात्रीच पकडून सकाळी न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

मराठा आंदोलकांवरील खुनाचे गुन्हे मागे घ्यावेत यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र या भेटीत काहीच तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे मराठा तरुणांना आता खुनाच्या गुन्ह्यात अटक होणे अटळ आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-…म्हणून मराठा आमदारांनी दिलेले राजीनामे तूर्तास स्वीकारले जाणार नाहीत!

-माझ्यावर आरोप म्हणजे 6 फुटाच्या म्हशीला 16 फुटाचं रेडकू- छगन भुजबळ

-मराठा आरक्षणावरुन महापौरांसमोरील कुंडी आणि ग्लास फोडला

-कोणत्याही मराठी तरूणाने जीव गमावू नये; राज ठाकरेंची हात जोडून विनंती

-मराठा आरक्षणासाठी आता काँग्रेस आमदाराचा राजीनामा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या