औरंगाबाद महाराष्ट्र

“अशोक चव्हाणांची हकालपट्टी करा आणि त्यांच्या जागेवर…”

औरंगाबाद | मराठा समिती्च्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाण यांची तात्काळ हकालपट्टी व्हावी आणि त्यांच्या जागेवर मंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार किंवा बाळासाहेब थोरात यांपैकी कुणाचीही नियुक्ती मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी केली आहे.

औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन मराठा क्रांती मोर्चाने यापुढील लढाई रस्त्यावर उतरुन लढू, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

EWS आरक्षणासाठी आम्ही लाखोंचे 58 मोर्चे काढले नव्हते किंबहुना आमच्या 42 बांधवांनी यासाठी हौतात्म्य पत्करलं नाही. जर 25 तारखेला आरक्षणावरील स्थगिती उठली नाही तर 26 तारखेपासून मराठा समाज रस्त्यावर उतरेल आणि या सरकारमधील मंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही, अशी आक्रमक भुमिका रमेश केरे पाटील यांनी मांडली.

मराठा आरक्षणावरील स्थगिती जर 25 जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी उठली नाही तर 26 जानेवारीपासून मराठा समाज रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिलाय.

थोडक्यात बातम्या-

फेसबूक पोस्ट करत महिलेचा अमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली…

मी परत जाईन, परत जाईन म्हणायला त्यांना कोणी बोलावलंही नव्हतं- अजित पवार

धक्कादायक! ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याचा धरणात बुडून मृत्यू

देशात भाजपची तानाशाही सुरू आहे, विरोधकांनी एकत्र यायला हवं- संजय राऊत

धक्कादायक! राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यानेच केले एकनाथ खडसेंवर अत्यंत गंभीर आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या