उस्मानाबाद | दहावीला 94 टक्के गुण असूनही चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही म्हणून मराठा समाजातील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
कळंब तालुक्यातील देवळाली गावातील अक्षय शहाजी देवकर असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. शिक्षणाच्या काळजीने अक्षयने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
अक्षयला डॉक्टर व्हायचं होतं. त्या दिशेने त्याची वाटचाल सुरु होती. त्याने दहावीला 94 टक्के गुण मिळवले तरीदेखील त्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही म्हणून त्याने आत्महत्या केली.
दरम्यान, आरक्षण गेलं खड्ड्यात आधी पदवीपर्यंतचं शिक्षण सर्व जातीच्या विद्यार्थ्यांना मोफत करा, अशी मागणी भाजपचे सहयोगी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.
उस्मानाबाद येथील देवळाली गावातील मराठा समाजातील युवक अक्षय शहाजी देवकर याने आपले आयुष्य संपवले आहे. नुकत्याच झालेल्या दहावीच्या परिक्षेत त्याला ९४% गुण मिळून सुध्दा चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नव्हता!
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 21, 2019
महत्वाच्या बातम्या
-अभिजीत बिचुकलेला ‘बिग बॉस’च्या घरातून अटक
-पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळाली जीवे मारण्याची धमकी
-काँग्रेसचं पानिपत झालं म्हणून आमच्याबरोबर बसायला तयार आहात का?- प्रकाश आंबेडकर
–दुष्काळ प्रश्नावर सरकारला धारेवर धरणाऱ्या ‘या’ काँग्रेस आमदाराचा झिंगाट डान्स व्हायरल
-रविशंकर प्रसाद यांच्याकडून तिहेरी तलाकविरोधी विधेयक लोकसभेत सादर
Comments are closed.