…तर एकही मराठी चित्रपट प्रदर्शित होणार नाही!

मुंबई | सरकारने मराठी चित्रपटांसाठीचा जीएसटी संपूर्णपणे माफ करावा, अन्यथा १ जुलैपासून संपावर जाऊ. तसेच एकही मराठी चित्रपट प्रदर्शित केला जाणार नाही, असा इशारा मराठी चित्रपट निर्मात्यांनी दिला आहे. 

प.बंगालमध्ये चित्रपट करमुक्त होत असतील तर महाराष्ट्रात का नाही, असा सवाल चित्रपट निर्मात्यांनी विचारला आहे. तसेच मराठी चित्रपट जिवंत ठेवायचे असतील तर सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा, असं मेघराज राजे भोसले यांनी म्हटलंय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा