बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठमोळी सई ताम्हणकर दिसणार ‘या’ हिंदी चित्रपटात, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

मुंबई | मराठी इंडस्ट्रीतील बोल्ड आणि तितकीच अभिनयात मुरलेली म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजेच सई ताम्हणकर. मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सईनं अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. सईनं तिच्या अभिनयातून तिची एक खास ओळख निर्माण केली आहे. अशातच आता सईनं तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली आहे.

सईनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ‘मिमी’ या हिंदी चित्रपटात झळकणार असल्याचं सांगितलं आहे. यासोबतच सईनं पोस्ट शेअर करत म्हटलं की, या जुलैमध्ये,सामान्य पासून विलक्षण अपेक्षा! संपर्कात रहा. मिमी.

मिमी या चित्रपटात मुख्य भूमिकेत क्रिती सेनन दिसणार आहे. चित्रटाचा विषय सरोगसी असा आहे. त्या चित्रपटाचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा चित्रपट देखील डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मीमी चित्रपट मला आई व्हायचंय या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. सई ताम्हणकरसोबत पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकरने केले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar)

थोडक्यात बातम्या – 

“आघाडीची चिंता न करता शिवसेना बळकट करा, शिवसैनिकांच्या पाठिशी पक्ष खंबीरपणे उभा”

इगतपुरी रेव्ह पार्टीमध्ये अटक झालेल्या हीना पांचाळसह 25 जणांना न्यायालयीन कोठडी

क्रिती सेनाॅनने ओटीटीवर रिलीज होणाऱ्या ‘मिमी’ चित्रपटातील लुक केला शेअर

कौतुकास्पद! गरजूंना मोफत जेवण देणाऱ्या ‘या’ व्यक्तीचा ब्रिटनकडून सन्मान

मंत्रिपद मिळताच ज्योतिरादित्य शिंदे मोदींविरोधात आक्रमक?, जाणून घ्या काय आहे सत्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More