बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठमोळ्या संजलने अमेरिकेत खासगी अंतराळ यान बनवणाऱ्या टीममध्ये पटकावलं स्थान!

मुंबई | संजल गावंडे या मराठमोळ्या तरुणीने अमेरिकेमध्ये अंतराळात झेपावणारे ‘न्यू शेफर्ड’ हे खासगी यान बनवणाऱ्या टीममध्ये स्थान पटकावलं आहे. ती कल्याण पूर्वेकडील रहिवाशी आहे. तिच्या या कामगिरीबद्दल तिचे सर्वच स्तरांतून भरभरून कौतुक केलं जात आहे. तिच्या या यशामुळे कुटूंबियांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे.

‘न्यू शेफर्ड’ हे खासगी यान आहे. अंतराळ क्षेत्रात ‘न्यू शेफर्ड’ अंतराळ सफरचे लाँचिंग म्हणजे एक मैलाचा दगड मानला जात आहे. या यानातून प्रवास करण्यासाठीची किंमत तब्बल 28 मिलियन डॉलर इतकी आहे. हे रॉकेट डिझाईन करणाऱ्या 10 जणांच्या टीममध्ये संजल गावंडेचा समावेश आहे.

येत्या 20 जुलैला ‘ब्ल्यू ओरिजिन’ कंपनीतर्फे ‘न्यु शेफर्ड’ हे खासगी यान जगप्रसिद्ध ब्रँड अमेझॉनचे संस्थापक आणि ब्ल्यू ओरिजिन कंपनीचे मालक जेफ बेझोस यांच्यासह काही मोजक्या पर्यटकांना घेऊन अंतराळात झेपावणार आहे. हे यान बनवणाऱ्या कंपनीच्या टीममध्ये संजलचा समावेश आहे.

दरम्यान, संजल ही कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील रहिवाशी. तिची आई सुरेखा गावंडे या एमटीएनएलच्या कर्मचारी, तर वडील अशोक गावंडे हे कल्याण डोंबिवली महापालिकेचे निवृत्त कर्मचारी आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; घराच्या बाहेर पडत असाल तर सावधान

“शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी करून आपले देव, धर्म बासणात गुंडाळलेत”

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; विविध विषयांवर अर्धा तास चर्चा

“…तर अशा लोकांवर गंगामाईचा कोप झाल्याशिवाय राहणार नाही”

“जेव्हा लोक मला शिव्या देत होते, तेव्हा पवार साहेबांनी मला विरोधी पक्षनेता केलं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More