बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नव्या लुकसह ‘मारूती सुझुकी स्विफ्ट’ लवकरच बाजारात धडकणार; जाणून घ्या किंमत

मुंबई | मागील काही वर्षात भारतात मारूती सुझुकी स्विफ्ट सर्वात लोकप्रिय कार ठरली आहे. तरूणांमध्ये स्विफ्टची मागणी जास्त असते. जर स्विफ्ट घेण्याचा विचार करत असाल तर खास मारूती सुझुकी स्विफ्ट एका नव्या स्वरूपात बाजारात येत आहे.

मारूती सुझुकीने जुन्या स्विफ्टला मिडलाईफ मेकओवर करून बाजारात आणलं आहे. या फेसलिफ्टेड स्विफ्टने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात पर्दापण केलं आहे. त्यानंतर ही स्विफ्ट भारतीय बाजारात उतरण्यास तयार आहे. फेसलिफ्टेड स्विफ्ट लाँच करण्यापुर्वी मारूती सुझुकीने गाडीचा अधिकृत टिझर जारी केेला आहे. 2017 चे स्विफ्टचे थर्ड जनरेशन माॅडेल भारतात सध्या उपलब्ध आहेत. स्विफ्ट 2021 या माॅडेलमध्ये मोठे बदल नसले तरी काही प्रमाणात बदल केले गेले आहेत.

स्विफ्टचे नवीन माॅडल हे आंतरराष्ट्रीय व्हेरिएंटप्रमाणेच असेल. माॅडलमध्ये हेडलाॅम्प्समध्ये बदल केले आहेत. क्रोम आणि ग्रिलमध्ये पुर्ण बदल केले आहेत. बम्परमध्ये देखील किंचीत बदल करण्यात आले आहे. कंपनीने सांगितलं आहे की, लिमीटलेस थ्रिल आणि स्टनिंग लुकसह हे माॅडेल भारतात येईल.

गाडीच्या इंटिरियर मध्ये फारसा बदल झालेला दिसत नाही. यात ग्राहकांना 7.0 इंचाची स्मार्टप्ले स्टुडियो इंफोटेन्मेंट सिस्टीम मिळणार आहे. अँड्रोईड आणि अॅपल कारप्लेसह मिळणार आहे. तर गाडीत सेमी डिजीटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर दिलं जाऊ शकतं. या कारमध्ये 1.2 लीटर न्युट्रल डुएल जेट पेट्रोल इंजीन दिलं जाणार आहे. या सर्व नवीन फिचरमुळे स्विफ्ट आता अधिक आकर्षक होणार आहे. या गाडीची किंमत 5.19 लाख ते 8.02 लाख रूपये असू शकेल.

थोडक्यात बातम्या-

सरकारच्या धोरणांशी सहमत नाही म्हणून प्रत्येकाला कारागृहात डांबू शकत नाही’; न्यायालयाचा दिशा रवीला जामीन

“संजय राठोडांची अवस्था ‘सामना’मधल्या भेदरलेल्या सरपंचासारखी”

‘4 नाही, तर 40 लाख ट्रॅक्टर घेऊन तयार राहा’; राकेश टिकैत आक्रमक

“…तर उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत”

कुख्यात गुंड गजा मारणे विरोधात पुणे पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More