नवी दिल्ली | अमेरिकेमध्ये रहिवासी असणाऱ्या एका व्यक्तीने व्यवस्थितरित्या मास्टर प्लॅन बनवून भारतात असणाऱ्या पत्नीची हत्या केली आहे. यासाठी पतीने अतिशय धक्कादायक कट रचला होता. विशेष बाब म्हणजे या हत्येमागील कारण अत्यंत धक्कादायक आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना तामिळनाडूमधील तिरुवरुर येथे घडली आहे. संबंधित पत्नीचं नाव जयाभारती असं आहे. जयाभारती यांचं लग्न पाच वर्षांपुर्वी आरोपी विष्णुसोबत झालं होतं. त्यानंतर जयाभारती त्यांच्या पतीसोबत अमेरिकेमध्ये राहत होत्या. मात्र दोघांमध्ये सतत भांडण होत असल्यामुळे जयाभारती भारतात परतल्या. काही दिवसांनंतर जयाभारती यांनी त्यांच्या पतीला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. यातूनच पोटगी द्यावी लागेल या भितीतून ही हत्या करण्यात आली आहे.
माहेरी असणाऱ्या जयाभारती 21 मे रोजी नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीवरुन कामाला निघाल्या होत्या. दुचाकीवरुन कामाला जाणाऱ्या जयाभारतीला एका ट्रकने धडक दिली आणि नंतर तेथून पळ काढला. पादचाऱ्यांना हा अपघात लक्षात येताच जयाभारती यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. जयाभारती यांच्या कुटुंबियांना संशय आल्याने त्यांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी अनेक पुरावे सापडल्यामुळे पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर संबंधित ट्रक जयाभारती यांचा घरापासून पाठलाग करत असल्याचं समोर आलं. ट्रक मालकाचा पत्ता लागल्यानंतर आपण ट्रक विकला असल्याचा बनाव मालकाने केला. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर संबंधित आरोपींना पती विष्णु यांनी सुपारी दिली असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
थोडक्यात बातम्या-
कोरोना लस घेतल्यानंतर 2 वर्षातच होणार मृत्यू?; जाणून घ्या या व्हायरल मेसेजमागचं सत्य
‘मैनू काला चष्मा जचता है’ म्हणत नवरीची लग्न मंडपात धमाकेदार एन्ट्री, पाहा व्हायरल व्हिडीओ
पत्नीच्या फोटोवरुन नवा वाद; इरफान म्हणतो, मी तिचा मालक नाही!
होम आयसोलेशन बंद या राज्य सरकारच्या निर्णयावर पुणे महापालिकेने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण
Comments are closed.