बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘द वाॅल’चा मास्टरप्लॅन तयार! न्यूझीलंडविरूद्ध ‘या’ रणनितीसह मैदानात उतरणार

नवी दिल्ली | भारतीय क्रिकट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून द वाॅल राहुल द्रविडनं सुत्र हातात घेतली आहेत. द्रविड आपल्या शिस्तप्रियतेसाठी ओळखला जातो. अंडर-19 संघाचा प्रशिक्षक असताना त्याच्या मुशीत तयार झालेले अनेक खेळाडू सध्या आंतरराष्ट्रीय संघात खेळत आहेत. अशातच आता द्रविडनं न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी मास्टरप्लॅन तयार केला आहे.

सध्या भारत न्यूझीलंडविरूद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारताचा नियमीत कर्णधार विराट कोहली सध्या सुट्टीवर आहे. म्हणून संघाचं नेतृत्व मुंबईकर अजिंक्य रहाणे करत आहे. तसेच या कसोटी मालिकेतून रोहित शर्मानं विश्रांती घेतली आहे. परिणामी राहुल द्रविड केएल राहुलच्या जोडीला कोणाला पाठवणार हा प्रश्न होता.

केएल राहुलचा भन्नाच फाॅर्म पहाता तो सलामीला खेळणार आहे. पण त्याच्यासोबत दुसरा सलामीवीर म्हणून द्रविडनं मयंक अग्रवालला पसंती दिली आहे. परिणामी शुभमन गिलला मधल्या फळीत खेळवण्याचा प्लॅन राहुल द्रविडनं तयार केला आहे. राहुल द्रविड आगामी काळासाठी भारतीय संघाची बांधणी करत आहे. परिणामी अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांचे पर्याय शोधण्याचा त्याचा विचार आहे.

दरम्यान, शुभमन गिल जर मधल्या फळीत खेळायला उतरला तर येत्याकाळात त्याला फायदा होणार आहे. कारण रोहित शर्मा परत संघात सामिल झाल्यावर शर्मा सलामीला खेळणार आहे. या पार्श्वभूमीवर राहुल द्रविड आपला प्लॅन कशाप्रकारे राबवतो हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या 

‘एकनाथ शिंदेंनी भाजपमध्ये येऊन आयुष्य सुखकर करावं’; भाजपची खुली ऑफर

“ठाकरे सरकारने मराठा समाजाची माफी मागावी, देवेंद्र फडणवीसांच्या काळात…”

“गावातली ग्रामपंचायत तरी खडसेंच्या ताब्यात आहे का?”

‘नवीन वर्षात भाजपचं सरकार येणार’; चंद्रकांत पाटलांचा दावा

“गुजरातसारखं महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करायची का?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More