बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना काळात ‘मस्ती की पाठशाला’; ऑनलाईन शाळेच्या माध्यमातून शैक्षणिक अभ्यासक्रमावर भर

पुणे | कोणतीही समस्या असो आपले विचार पॉझिटिव्ह असले की त्यावर उपाय सापडतोच या विचारानेच सध्याच्या या महाभयंकर कोरोना महामारीमुळं संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आणि शिक्षकांपुढं लॉकडाऊनमध्ये शाळा बंद पण शिक्षण चालू ठेवणं आणि नुसतंच शिक्षण चालू न ठेवता पालकांचा, विद्यार्थ्यांचा त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा मानसिकतेचा विचार करून शैक्षणिक गुणवत्ता वाढवणं व ती टिकवणं याचं फार मोठं आव्हान बनलं आहे.

कोरोना काळात ऑनलाईन शाळेच्या माध्यमातून शैक्षणिक अभ्यासक्रमावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच मैदानी खेळ, विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, ऍक्टिव्हिटी, व्यायाम हे शिकायलाही आवडत असते. त्याच पार्श्वभूमीवर अँक्टिव्ह टीचर्स समूहानं ‘मस्ती की पाठशाला’ हा नवीन उपक्रम सुरू केला आहे.

या पाठशालेत बाहुलीनाट्य, कथा, गोष्टी, चित्रकला आणि हस्तकला दाखवल्या जातात. तसेच आरोग्यदायक व्यायामही करून घेतला जातो. युट्युब, झूम, व्हाट्स अँपच्या माध्यमातून चालणाऱ्या या ऑनलाइन उपक्रमात दररोज राज्यभरातून 10 ते 20 हजार विद्यार्थी सहभागी होत आहेत, अशी माहिती समूहाचे राज्य संयोजक विक्रम अडसूळ यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.

दरम्यान, उपक्रमासाठी आमचे सर्व सदस्य कार्यरत आहेत. शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होण्याच्या अनुषंगानं समूहाकडून शैक्षणिक तयारी करून घेतली जाणार आहे. 15 जून पासून शालेय अभ्यासक्रमाला सुरुवात केली जाणार आहे. 1 ऑगस्टपासून नियमित अध्यापन केलं जाणार असल्याचंही अडसूळ यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या – 

लहान मुलाला समोर बघताच वाघाने केला हल्ला अन्…; पाहा व्हिडीओ

विकृतीचा कळस! कोरोनाग्रस्त सासूने सुनेला आणि नातवाला मारली मिठी अन्…

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करुन घरातच पुरला मृतदेह, चिमुकलीला धमकी, पाहा व्हिडीओ

पुण्यातील गरवारे शाळेच्या मैदानावर केला मित्राचा खून अन्….

6 वर्षीय मुलीच्या ‘या’ व्हिडीओवर शिक्षण विभागाने घेतली दखल, बदलली ऑनलाईन क्लासची वेळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More