बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वाराणसीतील मोदींच्या विजयासाठी गुंडांकडून स्थानिकांना धमकावलं जातंय; मायावतींचा आरोप

वारणसी | पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाराणसी लोकसभा मतदारसंघातून जिंकवण्यासाठी स्थानिक नागरिकांना बाहेरील गुंडांकडून धमकावलं जात आहे, असा आरोप बसपा अध्यक्षा मायावती यांनी मोदींवर केला आहे. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.

वाराणसीमध्ये कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदींना जिंकवण्यासाठी प्रयत्न केेले जात आहेत. वाराणसीत गल्ली बोळात जाऊन आधी अमिष दाखवलं जातं आणि मग त्यांना धमकावलं जातं, असा आरोप केला आहे.

वाराणसीतील निवडणूक निष्पक्ष आणि स्वतंत्र्य कशी होईल? बंगालप्रमाणे निवडणूक आयोगाचे वारणसीमध्ये लक्ष का नाही?, असा सवाल मायावतींनी उपस्थित केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये घडलेला हिंसाचार हा भाजपकडून ममतांना लक्ष्य करण्यासाठी करण्यात आला. पंतप्रधानपदाला हे शोभणारं नाही, असंही मायावती म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

-अजय देवगणने सांगितलं तब्बूच्या लग्न न करण्यामागचं कारण

-पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढला

-कमल हसन यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; म्हणतात…

-भाजप नेत्याने केली राजीव गांधींची नथूराम गोडसेसोबत तुलना

-भाजपच्या तीन वाचाळवीरांना दणका; पक्षाने केली ‘ही’ कारवाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More