बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…हे कदाचित राज ठाकरे यांना माहित नसावं’; राज ठाकरेंच्या टीकेला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर

मुंबई | येत्या निवडणुकीच्या पाश्वभूमीवर आता राज्यात सत्ता संघर्षाला सुरूवात होताना दिसत आहे. काल एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीपातीचा मुद्दा मोठा झाला, असं राज ठाकरे बोलताना म्हटले होते. त्यानंतर आता त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने पलटवार केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस हा शाहू- फुले- आंबेडकर या विचारांचा आहे. आम्ही ठरलेल्या धोरणानुसारच राजकारण करतो. मात्र राज ठाकरे यांना हे माहित नसावं किंवा त्यांना जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा, म्हणून ते अशा प्रकारचं वक्तव्य करत आहेत, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. देशात मनुवादी व्यवस्थेमुळे जातीव्यवस्था उभा राहिल्या. त्यामुळे देशात अनेक लोकांवर अन्याय होत राहिला, हे कदाचित राज ठाकरे यांना माहित नसावं, असंही मलिक म्हणाले.

सर्वांना आपापल्या जातीचा अभिमान वाटतो आणि आजही लोकांना अभिमान वाटत आहे. त्याचसोबत आता दुसऱ्याच्या जातीचा द्वेष देखील लोकांच्या मनात निर्माण झालाय. महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीच्या जन्मापासून जातीपातीचा मुद्दा मोठा झाला, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं. महाराष्ट्र सध्या जातीच्या राजकारणात गुंतत चाललाय. तरूणांनी यातून बाहेर पडायला हवं, असं राज ठाकरे म्हणाले होते.

दरम्यान, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या 3 महामानवांनी जातीव्यवस्था संपवण्याचं काम केलं. त्यांनी समता मुलुक संपवण्याचं देखील काम केलं, हेही राज ठाकरे यांना माहिती नसावं, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

राज ठाकरेंचं ‘मिशन पुणे’; आजपासून दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर

‘वे डरते हैं…’; कविता ट्विट करत जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

अखेर 8 लाखांची लाच घेणाऱ्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीरला अटक!

“चंद्रकांत खैरे जळक्या वृत्तीचे, इम्तियाज जलील चंद्रकांत खैरेंपेक्षा चांगले खासदार”

‘राहुल गांधींना लोकसभेतून निलंबित करा’; रामदास आठवलेंची मोठी मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More