‘त्यांनी मला चिठ्ठी दिली आणि मी भावाच्या धाकाने…’, किशोरी पेडणेकरांनी सांगितला प्रेमकहाणीतील ‘तो’ किस्सा
मुंबई | ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळ्या पाहुण्यांना चर्चेसाठी आणि धमाल मस्ती करण्यासाठी आमंत्रण असते. आता आज आणि उद्याच्या भागात राजकारणी या मंचावर येणार आहेत. शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर आणि शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील या कार्यक्रमात येणार आहेत. त्यांनी या कार्यक्रमात बरीच धमाल केली आहे आणि काही आठवणी देखील सांगितल्या आहेत.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या प्रेमकहाणीतील काही किस्से सांगितले आहेत. त्यांनी यावेळी भावाच्या धाकाने प्रियकराने दिलेली चिट्ठी खावून टाकावी लागली असे सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या मला माझ्या प्रेमकहाणीमधील एक किस्सा आठवतो. एकदा सगळे घरी असताना, मला त्यांनी घाईघाईत चिट्ठी दिली होती, आणि ती हातातून खाली पडली. ती नेमकी माझ्या भावाने पाहिली. मला कळालं आता हा विचारणार, त्याला कळू नये म्हणून दिलेली चिठ्ठी मला खावून टाकावी लागली.
या भागात काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल सगळं ओकेमध्ये आहे, असे म्हणणारे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील हे सुद्धा येणार आहेत तेव्हा. दोन विरोधक एका मंचावर एकत्र दिसणार आहेत. तसेच राजकारण्यांचे मजेदार आयुष्य, त्यांच्या काही खाजगी गमतीशीर गोष्टी सुद्धा ऐकायला आणि पाहायला मिळणार आहेत.
महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर ही शिवसेना आणि शिंदे गट अशी विभागली गेलेली मंडळी एकाच व्यासपीठावर आता महाराष्ट्राला दिसणार आहेत. यावेळी या मंचावर राजकीय मतभेद आणि आरोप प्रत्यारोप न करता केवळ एक राजकारणी म्हणून हे सर्व एकत्र जमणार आहेत.
थोडक्यात बातम्या –
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात, सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधक सज्ज
देशात कोरोनाची चौथी लाट आली?, धडकी भरवणारी आकडेवारी समोर
‘आता राऊतांनीच जरा शांततेची भूमिका घ्यावी’ -दीपाली सय्यद
‘संजय राऊत मुर्ख माणूस, त्यांनी फक्त…’; राऊतांवर टीका करताना शिरसाटांची जीभ घसरली
पुनित राजकुमारचा शेवटचा चित्रपट ‘या’ तारखेला प्रदर्शित होणार, पोस्टर पाहून चाहते भावूक
Comments are closed.