फेरीवाल्यांचा प्रश्न चिघळण्यास राज्य सरकार जबाबदार- शिवसेना

मुंबई | शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न राज्य सरकारमुळे चिघळलाय, असा आरोप मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलाय. महापौरांनीच अशी प्रतिक्रिया दिल्यानं पालिकेनं या प्रश्नावर हात झटकल्याचं दिसतंय.

पोलिस आणि पालिका अधिकाऱी फेरीवाल्यांकडून हप्ते घेतात, असा आरोप मनसेनं केला होता. त्यावर शिवसेना काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यावर महापौर महाडेश्वरांनी राज्य सरकारवरच तोफ डागलीय.

दरम्यान, काही दिवसांपासून मनसेनं फेरीवाल्याविरोधात आंदोलन छेडलं होतं, त्यानंतर मनसेचे विभाग प्रमुख सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी हल्लाही केला होता.