महाराष्ट्र मुंबई

“पंतप्रधान नरेंद्र मोदी अंबानी-अदानीसाठी काम करत आहेत”

मुंबई | उद्योगपती अंबानी-अदानी यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत. शेतकरी एकीकडे हमी भाव मागतो, ते तुम्ही देत नाही आणि अशा कंपन्यांना धान्य साठ्याची साठेबाजी करण्याचं कट आखताय?, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केलाय.

मोदी सरकार पुढच्या निवडणुकीसाठी फंडची तयारी करत आहे. केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांचा आम्ही विरोध करतो, असं मेधा पाटकर म्हणाल्यात. त्या ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होत्या.

आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. आंदोलन सुरुच राहणार. 18 आणि 20 जानेवारीला आणि पुढेही महिला आंदोलनात सक्रीय होतील, असं मेधा पाटकर म्हणाल्या.

हे मोठमोठे गोडाऊन बनवत आहेत. हे कायदा थोपवण्याचं काम करत आहेत. भूक, तहाण भागवणारा हा शेतकरी दर 17 मिनिटाला आत्महत्या करतोय. हे आंदोलन नव्या स्वातंत्र्यासाठी होत असलेलं आंदोलन आहे, असं मेधा पाटकर म्हणाल्यात.

थोडक्यात बातम्या-

“आदित्य ठाकरे म्हणजे आजोबांचं स्वप्न पूर्ण करणारा, वाघाचं हृदय असणारा खरा नातू”

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत गुंडगिरी करून माझ्या पक्षाचं नाव खराब करत आहेत- रामदास आठवले

पालघर साधू हत्याकांड प्रकरणी अटकेतील आणखी 89 आरोपींना जामीन मंजूर

“शरद पवारांनी नैतिकता पाळावी, चौकशी होईपर्यंत मुंडेंचा राजीनामा घ्यावा”

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांनी आधी लस टोचावी त्यानंतर मी लस टोचून घेईन- प्रकाश आंबेडकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या